Disha Shakti

Uncategorized

प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरीच्या १० विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन पब्लिक स्कूलसाठी निवड

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनुस : पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथील दहा विद्यार्थ्यांची यावर्षी गुणवत्तेच्या निकषावर नांदेड जिल्ह्यातील विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडीसाठी पुढील शिक्षणासाठी निवड झाली असून निवडीचे पत्र नुकतेच शाळेला प्राप्त झाले आहे. एकाच वेळी दहा विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन पब्लिक स्कूलसाठी निवड होण्याची ही राज्यातील बहुतेक पहिलीच वेळ असेल.

        ज्याप्रमाणे नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्रता परीक्षा असते. त्याच प्रमाणे विद्यानिकेतन प्रवेशासाठी परीक्षा असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतून या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे महाराष्ट्र राज्यातून निवड केली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक आश्रमशाळेचे एकूण दहा विद्यार्थी पात्र झाले असून यातील गुणानुक्रमे सुयश रभाजी शिंदे, कु. अनुष्का धोंडीभाऊ वाळुंज, सोहम अशोक महारनवर, कु. संस्कृती मनोज देवकाते, कु. अनुष्का सतीश भनगडे, कु. चैतन्या बाबाजी वाजे, कु. पूर्वा सतीश भनगडे, कु. तनुजा आबासाहेब ठाणगे, कु. स्नेहल संदीप वाघ, कु. मेघा संपत दरेकर या दहा विद्यार्थ्यांची यावर्षी गुणवत्तेच्या निकषावर विद्यानिकेतन प्रवेशासाठी निवड झाली आहे.

       या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक लतिफ राजे, शिक्षक संतोष पट्टेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे आमदार निलेशजी लंके, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे, संस्थेचे अध्यक्ष शाहीद काझी, सचिव रेहान काझी, ढवळपुरीच्या सरपंच नंदाताई गावडे, उपसरपंच बबन पवार सर, सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे, दुर्गेश्वरी दूध संस्थेचे चेअरमन सुखदेव चितळकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर तसेच शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागा मार्फत विद्यानिकेत पब्लिक स्कूल कमळेवाडी जिल्हा नांदेड या ठिकाणी प्रवेश दिला जातो. या थठिकाणी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. महाराष्ट्र राज्यातून ८० विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश दिला जातो. यातील ६४ विद्यार्थी हे विमुक्त जाती भटक्या जमातीतील तर १६ विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील असतात.
मुख्याध्यापक संदीप महांडुळे

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.

यावर्षी प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरीच्या दहा विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडीसाठी निवड झालेली आहे. एकाच वेळी एका आश्रमशाळेतील दहा विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन प्रवेशासाठी निवड होण्याची हि महाराष्ट्र राज्यातील बहुतेक पहिलीच वेळ असेल. याचा आम्हाला अभिमान आहे. यातून ढवळपुरी आश्रमशाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची झलक दिसते.

वर्गशिक्षक लतिफ राजे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!