प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील असलेल्या कोळेवाडी येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेची ईमारत आणि शाळेतील मुलींची वसतीगृहाचे बांधकाम हे सुरू असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे निष्पन्नात आल्यावर समस्थ कोळेवाडी सरपंचासह शाळा व्यवस्थापन प्रशानाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. कोळेवाडी येथील आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेचे बांधकाम हे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे 13 फेब्रुवारी 2023 रोजी कोळेवाडी गावचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती चे कार्यकर्ते यांनी आपल्या उपस्थितीत शाळेच्या कामाची पाहणी केली असता सुरू असलेल्या दोन्ही शाळेच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर त्रूटी आढळून आल्या असून वाळू मध्ये क्रश व सेन्ड पावडर मोठ्या प्रमाणात मिसळून आल्याचे दिसून आले.
एक सिमेंट गोणी करीता सुमारे 16 ते 17 घमेले वाळू व खडी वापरण्यात येत असल्याचे दिसून आले. बांधकामासाठी सुरू असलेल्या कमतरतेचे व निष्कृट गोष्टींचा पाडा वाचला असता ठेकेदाराने उडवा उडवीची उत्तरे दिली. आश्रमशाळेचे बांधकाम हे योग्य आराखड्यामध्ये नसून ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या आराखड्यावर व निष्कृट दर्जाचे सुरू असल्याचे समजले आहे.कोळेवाडी गावातील सरपंचासह शाळा व्यवस्थापन समीतीच्या सदस्य व पदाधिकारी यांनी ईमेलद्वारे आदिवासी विकास मंत्री, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि विरोधी पक्षनेते यांना दिल्या आहेत. कोळेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेचे बांधकाम हे योग्य रित्या व परिपक्व आणि उच्च दर्जाचे न झाल्यास शासन व प्रशानाविरोधात कोर्टात जावे लागेल अशी भुमिका कोळेवाडी ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
Leave a reply