यवतमाळ प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे :आज बामसेफ लहुजी क्रांति मोर्चा व सर्व सहयोगी संघटनांची महागांव तालुकास्तरीय महत्वपुर्ण मिटींग शासकीय विश्रामगृह महागांव येथे यशस्वीरित्या अतिशय उत्साहात संपन्न झाली.या मिटिंगमध्ये महत्वपुर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.व तसेच महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.सर्व समावेशक तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर व तसेच लहुजी क्रांती मोर्चाच्या अंतर्गत पश्चिम विदर्भस्तरीय मातंग समाज वैचारीक मेळावा व प्रशिक्षण शिबीर यांचेही नियोजन करण्यात आले. व लहुजी क्रांती मोर्चा महागांव तालुका कार्यकारणीचे २०२३ या नविन वर्षासाठीची कार्यकारणी गठीत करण्यावरसुद्धा चर्चा करण्यात आली. व तसेच पुसद जिल्हा कार्यकारणी सुद्धा येनाऱ्यां काही दिवसातंच गठीत होईल. व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मा.प्रा.विकास पाथरीकर सर,लहुजी क्रांति मोर्चा (प्रदेश अध्यक्ष) यांच्या हस्ते देण्यात येनार आहे.
या मिटींगचे प्रास्ताविक मा.विनोद बनसोडे,लहुजी क्रांति मोर्चा (महागांव ता.संयोजक) यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून मा.किशोर नगारे सर,बहुजन क्रांति मोर्चा (महागांव ता.संयोजक) व तसेच मा.चक्रधर पाटील देवसरकर सर,राष्ट्रीय किसान मोर्चा (प्रदेश उपाध्यक्ष) व या मिटिंगची अध्यक्षता मा.अविनाश शेंडे सर,बामसेफ (महागांव ता.कार्याध्यक्ष) यांनी केली. तर सुत्र-संचालन मा.संजय बनसोडे सर,लहुजी क्रांति मोर्चा (पुसद जिल्हाध्यक्ष) यांनी केले व या मिटिंगचे आभार मा.रमेश कांबळे साहेब यांनी मानले. या मिटिंगला मा.सुदाम गायकवाड सर राजु कावडे सर मा.देविदास भालेराव सर मा.उत्तमराव भांडवले मा.विजय मामा भांडवले मा.विलास खिल्लारे मा.विठ्ठल हनवते मा.संतोष भालेराव मा.गजानन सुरोशे मा.अवधुत गवळी मा.अनिकेत हुपाडे मा.भिमराव पाईकराव मा.भगवान भांडवले मा.शाम बनसोडे मा.संदिप गोस्वामी मा.राजु भांडवले मा.अविनाश खंदारे मा.सुनिल बनसोडे मा.शुभम खंदारे मा.धम्मसंदेश कांबळे व मा.अनिकेत वाघ हे उपस्थीत होते.