दौंड तालुका प्रतिनिधी / किरण थोरात : कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसूली करण्याचे काम मागील काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, विद्युत वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपाचे कनेक्शन विविध भागात तोडणी चालू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूची थोडी तरी जाणीव करुन ही सक्तीची वीज वसुली थांबवून विज कनेक्शन कट करणे थांबवा, सक्तीची वीज बिल वसुली थांबवा शेतकऱ्यांची वीज तोडन्या अगोदर शेतकऱ्यांना लेखी नोटीस दिल्या शिवाय कुठल्याच शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करु नये,
जर हे थांबणार नसेल तर शेती पिकांच नुकसान झालं तर त्याची विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. एका डीपीवरील थकबाकी साठी संपुर्ण फिटर बंद करु नका आन्यथा आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राष्ट्रिय समाज पक्षाचे दौंड तालुका विधानसभा अध्यक्ष दादासाहेब भिसे यांनी दौंड तशील साहेब यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी दौंड विधानसभा अध्यक्ष दादासाहेब भिसे, अभिजित कोकरे, प्रशांत रुपनवर, गणेश भोसले, पोपट लाकडे, किरण सूळ आदी मान्यवर उपस्थित होते.