धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ तेरची संपूर्ण दुकाने कडकडीत बंद ठेवून तेरच्या नागरिकांनकडून निषेध व्यक्त करण्यात आला.मागील काही दिवसांपूर्वी वैयक्तिक आर्थिक देवाणघेवाणी वरून लोबाजी बगाडे व नाईकवाडी यांच्यात भांडण झाले होते. वैयक्तिक झालेल्या भांडणाचे स्वरूप दिनांक 15 फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी सह विविध कलमानुसार सुहास रतन नाईकवाडी,गुड्डू रतन नाईकवाडी, गणेश नाईकवाडी व बंडु कांबळे यांच्याविरुद्ध सिंधू बगाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैयक्तिक भांडणाचे स्वरूप जातिवादावर नेऊन ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करून काही समाजकंटक समाजा समाजामध्ये तेड निर्माण करत असल्यामुळे तेर येथील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी गून्हेच्या निषेधार्थ तेर बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला.तेरबिटचे बीट अंमलदार प्रदीप मुरुळीकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर 325 नागरिकांनी सह्या केल्या आहेत.