संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख: संगमनेर तालुक्यातील साकूर जांबूत रस्त्यावरील साकूर येथील धुपेश्वर ओढ्यावरील पुलाच्या कामासाठी काही दिवस या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी कि साकूर ते जांबूत रस्त्यावरील असलेल्या धुपेश्वर ओढ्यावरील पुलाच्या कामासाठी वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला असून धुपेश्वर ओढ्यावरील पुलाचे काम पुर्ण करण्यात येई पर्यत काही दिवस साकूर जांबूत मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
धुपेश्वर ओढ्यातील पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली जाऊन रस्ता वाहतूक बंद पडत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, प्रवासी जनतेला मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात धुपेश्वर ओढ्यातील पुलाची उंची कमी असल्याने तसेच पुलाखालील पाईप संख्या कमी असल्याने पावसाळ्यात पाण्याची पुरजन्य स्थिती निर्माण होत होती आणि प्रवासी व शालेय विद्यार्थी यांचे जनजीवन विस्कळीत होत होते परंतू आत्ता साकूर ते जांबूत मार्गावरील धुपेश्वर ओढ्यावरील पुलाच्या कामामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याने जनतेकडून व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.
Leave a reply