इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : भिगवण पत्रकार संघटनेची दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी सागर हॉटेल येथे संध्याकाळी सात वाजता मीटिंग झाली. या मीटिंगसाठी भिगवण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी चालू राजकीय परिस्थिती, सामाजिक स्थिती यावर चर्चा झाली तसेच नवीन पत्रकार यांना महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. भिगवण पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारणी निवड ही पार पडली. यावेळी सर्वानुमते दादासाहेब थोरात यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची निवड करण्यात आली नितीन चितळकर यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष दादासाहेब थोरात यांनी असे सांगितले की आगामी काळात भिगवण या ठिकाणी चालू असलेले भिगवण पत्रकार संघटनेच्या कार्यालयाचे अपूर्ण काम पूर्ण करून भिगवण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचे हक्काचे कार्यालय चालू करू. भिगवण पत्रकार संघटनेची मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यांवेळी मावळते अध्यक्ष विक्रम भाऊ शेलार व भिगवण पत्रकार संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.