राहुरी प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या श्री केदारेश्वर देवस्थानच्या पावनभुमीतील असलेल्या म्हैसगांव येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह हा शिवरात्री निमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून केदारेश्वर मंदिरात भाविकांनी मादियाळी करत श्री केदारेश्वर महाराज देवस्थान म्हैसगांव येथे हजारो शिवभक्त यांनी दर्शनाला हजेरी लावली म्हैसगांव येथील श्री केदारेश्वर देवस्थानच्या मंदिरात दि.12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा लाभ घेतला. भक्त भाविकांची गर्दी लक्षात घेता म्हैसगांव येथील ग्रामस्थांच्या वतीने विविध सोय सुविधा आणि उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. केदारेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी शिवलिंग चे दर्शन घेतले.महाशिवरात्री निमित्त केदारेश्वर मंदिराच्या क्षेत्रात विविध विद्युत रोषणाई, भव्य दिव्य मंडप डेकोरेशन करण्यात आले होते.भाविकांच्या सेवेसाठी भजन,किर्तन आणि प्रवचन आदी कार्यक्रम ठेवण्यात आले होते.श्री केदारेश्वर निवासी ह.भ.प. लक्ष्मण पांचाळ महाराज यांच्या प्रेरणेने व ह.भ.प.भगवान महाराज यमनर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. केदारेश्वर मंदिराचा हरिनाम सप्ताहाची स्थापना 1986 साली होऊन आज रोजी जवळपास 27 वर्षे पूर्ण झाले आहे. शिवरात्री दिनानिमित्त दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ग्रंथराज तुकाराम गाथा मिरवणूक, कळश मिरवणूक, तसेच केदारेश्वर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज पांचाळ यांच्या काल्याच्या किर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.