राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे सालाबादा प्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवस महाशिवरात्र उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या असून या कार्यक्रमाचे आयोजन महादेव मंदिर देवस्थान मंडळ कृती समिती गोटूंबे आखाडा सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळ व भजनी मंडळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने करण्यात आले होते.17 फेब्रवारी रोजी रात्री ह.भ.प अमोल महाराज पिसे यांचे कीर्तन झाले व ह.भ.प पद्माकर तोडमल हे पहिल्या दिवशीचे सायंकाळचे अन्नदाते म्हणुन लाभले होते.
18 फेब्रवारी रोजी पहाटे महादेवाला रुद्राभिषेक घालून तसेच सकाळी गावातील तरुणांनी पुणतांबा येथून आणलेल्या कावड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती व रात्री 8 ते 11 या वेळेत ह.भ.प अशोक महाराज शेटे यांचे कीर्तन झाले व महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवभक्त मच्छिंद्र डहाळे यांचेकडून महादेवास तांब्याच्या धातुची नागफणी अर्पण करण्यात आली व महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्याकडून ग्रामस्थांना फराळाचे आयोजन करण्यात आले होते. व रविवारी 19 फेब्रूवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत बालकीर्तनकार ह.भ.प प्रणालीताई कोकाटे आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले होते.
कीर्तनाच्या सुरवाती आधी शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली या तीन दिवसीय कार्यक्रमात व असून हा कार्यक्रम महादेव मंदिर देवस्थान मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व ग्रामस्थ गावातील तरुण मंडळ, देवस्थान मंडळ, महीला भजनी मंडळ यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन महादेव मंदिर देवस्थान मंडळाच्या करण्यात आले होते.