Disha Shakti

Uncategorized

शेरी चिखलठाण येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

Spread the love

प्रतिनिधी  / शेख युनुस :  राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील ग्राम पंचायत मध्ये शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील नागरिकांच्या व शिवप्रेमी यांनी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. ‌ 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराष्ट्र राज्यात अस्सल मातीत एका शुरवीर राजाचा सिंहाचा जन्म झाला.शूरवीर, साहसी,तीव्र बुध्दिमत्ता, संघटन कौशल्य,मराठी स्वराज्याचे संस्थापक, संस्कृती चे रक्षणकर्त,थोर सेनानी,वेळ व माणसे ओळखण्याची अदभूत क्षमता व पारख त्याच प्रमाणे सर्व धर्म समभाव ,धर्मग्रंथ, धर्म स्थानांचा सन्मान, उत्तम चारित्र्य मुत्सद्दीपणा, राजकारणाची जाण आणि राष्ट्रकल्याण करणाऱ्या शूरवीर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणूसकी ने जगायला शिकवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्ताने शेरी चिखलठाण ,म्हैसगांव, कोळेवाडी, ताहाराबाद, चिंचाळे,आदी गावातील शिवप्रेमी आणि शिव कन्यांनी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत आपल्या राजाला मानाचा मुजरा देत जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा करत राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे अशी घोषणाबाजी करत शिवजयंती साजरी केली.

उपस्थित शेरी चिखलठाण येथील लोकनियुक्त सरपंच कार्यसम्राट डॉ. सुभाष काकडे पाटील, उपसरपंच आबासाहेब काळनर,प्रगतीशील शेतकरी संतोष शेठ काळनर,ईसाकभाई सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धिरज टेमकर,शरद बागुल, अहमदनगर जिल्हा पत्रकार शेख युनुस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय बाचकर,संजय काकडे, बाबाजान शेख,विजय डोमाळे, आब्दुल शेख,रफिक शेख, आप्पासाहेब डोमाळे, अशोकराव डोमाळे पाटील कलेक्शन उद्योग समूहाचे अध्यक्ष, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शेरी चिखलठाण येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!