Disha Shakti

Uncategorized

लीलापूर्विच घाटातून अवैध रेती उत्खनन करून चोरटी वाहतूक सुरू महसूल विभागाचे दुर्लक्ष

Spread the love

यवतमाळ प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : आर्णी, दारव्हा, दिग्रस तालुक्यातही जवळ्याचा उड्डाणपूल रेतीतस्कऱ्याचा लोकेशन स्पॉट आर्णी तालुक्यातील जवळा, शेकलगाव, ब्राह्मणवाडा, तरोडा, गणगाव, लोणी या गावशिवारातून अहोरात्र रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. लीलावापूर्विच पैंनगंगेसह अडान व अरूनावती पात्रातून रेतीतस्करी सुरू आहे.विशेष म्हणजे जवळ्याचा उड्डाणपूल सध्या रेती तस्करांचे लोकेशन केंद्र ठरला आहे. महसूल विभागातील अनागोंदीमुळे सध्या आर्णी तालुक्यात रेती तस्करीचा धुमाकूळ सुरू आहे. जवळा, शेकलगाव, ब्राह्मणवाडा, तरोडा, गणगाव,

लोणी या गावशिवारातून अहोरात्र रेतीची वाहतूक येत असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. काही ग्रामस्थ तर या संदर्भात लेखी रेती आहे. आर्णी नाकूळ तर वस्तुस्थिती द्यायला तयार आहेत. प्रशासनाला तस्करांची माहिती असली तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे काही चुकीच्या घटनांविरोधात माध्यमातून वृत्त आल्यास तस्करांसोबत संगनमत होत आहेत असल्याच्या बाबी प्रकर्षाने दिसून प्रशास काही तस्करांनी थेट म्हणजे तहसीलच्या गेटपासून नदीपात्रापर्यंतचे लोकेशन मिळावे म्हणून आपली माणसे तैनात केली आहेत. लोकेशन देनाऱ्यांधे प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. त्यामुळे महसूल प्रशासनातील वरिष्ठांनी यावर लक्षदेणे अनिवार्य झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!