Disha Shakti

Uncategorized

माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे म्हैसगांव केदारेश्वर पुलाच्या कामाला शुभारंभ

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथील केदारेश्वर मंदिराच्या समोरील राज्य महामार्ग क्रमांक. 36 वर असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरसाल दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून नेहमीच पाणी जात असल्यामुळे प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांच्या दळण वळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भभवत होता. राज्यमार्ग क्रमांक 36 हा अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ बहुल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा राजमार्ग आहे. तालुक्यातील शासकीय व वयक्तिक कामासाठी शालेय विद्यार्थी आणि सामान्य जनतेला पावसाळ्यात या पुलावरुन ये जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे लक्षात घेता माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या योग्य पाठपुराव्यामुळे म्हणजेच सन 2022 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार या पुलाच्या कामासाठी सुमारे 1 कोटी 31 लाखांचा निधी मंजूर केला होता.

माजी राज्य मंत्री व लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे म्हैसगांव केदारेश्वर येथील पुलाच्या कामाला गती प्राप्त झालेली आहे.प्राजक्त दादा तनपुरे यांनी व त्यांच्या कार्यकर्ते यांनी या कामाची पाहणी करत या पुलाचे काम योग्य प्रकारे व दर्जेदार परिपक्व करण्याचे आव्हान ठेकेदाराला दिले.या कामामुळे राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण, म्हैसगांव, आग्रेवाडी,दरडगांव थडी,कोळेवाडी, आदी गावातील जनतेच्या व शालेय विद्यार्थी यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने योग्य होईल. म्हैसगांव राहुरीला जोडणाऱ्या या पुलावरून पावसाळ्यात नेहमीच मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह होत असून हा पुल पाण्याखाली जात होता,त्यामुळे राहुरी म्हैसगांव रस्त्यावरील संपर्क तुटत होता. प्रवाशांना व शालेय विद्यार्थी यांचे जनजीवन विस्कळीत होत होते.सद्या ह्या पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे म्हैसगांव पंचक्रोशीतील नागरिकांनी व शालेय विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त करत माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे अभिनंदन व्यक्त केले आहे.

यावेळी उपस्थितीत लोकप्रिय माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष मोठ्या भाऊ (गहिनीनाथ हुलूळे ),शेरी चिखलठाण येथील लोकनियुक्त सरपंच कार्यसम्राट डॉ ‌.सुभाष पाटील काकडे, माजी उपसभापती विजय आंबेकर, अशोक कर्डे,माजी सरपंच दिपक गागरे, नानासाहेब विधाटे,सचिन गागरे, शशिकांत हांडे, बापुसाहेब रोकडे, धनंजय गागरे, विजय झावरे, स्वप्नील गागरे, आदी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!