अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील गाडकवाडी शिवारातील वारे वस्तीवरील वनपरिक्षेत्र परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून एक शेळी ठार मारली. सविस्तर माहिती अशी कि,राहुरी तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागातील वारे वस्तीवरील दादाभाऊ हरिभाऊ वारे यांची शेळी शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने भ्याड हल्ला करत शेळी ठार मारली.या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक मदन गाडेकर, वनमजूर सुनील अमोलीक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
गाडकवाडी येथील नागरिकांच्या पशूधनाला धोक असल्याचे लक्षात घेता वनविभागाने गावात बैठक घेऊन बिबट्याला जेरबंद करू असे आश्वासन दिले. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, पशूधन यांना धोका असल्यामुळे या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याचे गाडकवाडी येथील नागरिकांनी विनंती केली करत गाडकवाडी शिवारात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
Leave a reply