पुणे प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या बॅनर वॉरमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या समर्थकाने बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे. ‘सगळं चोरलं पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार? आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत’ असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. तर शिंदे गटाने लावलेल्या फ्लेक्सवर ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुण्यातील धनकवडी भागात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले.तर शिंदे गटाने शहरातील पाच चौकांमध्ये बॅनर लावले आहेत.यावर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे स्वर्गातून आशीर्वाद