Disha Shakti

Uncategorized

श्री.केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगांव येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथील पंचक्रोशीतील जिल्हा भर नावाजलेले आणि शैक्षणिक दृष्टीने अग्रेसर व म्हत्वाचे असलेल्या श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा मोठ्या आनंदात व उत्साहात आयोजित करण्यात आला श्री.केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगांव येथील विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत म्हैसगांव येथील पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी शिक्षण घेत असून आत्ता पर्यंत या केदारेश्वर माध्यामिक विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणातून विविध क्षेत्रात नाव लौकीक केलेले असून केदारेश्वर विद्यालयाचे नांव जगभर संपादित केलेले आहे.

डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे संस्थेच्या अनेक शाखा ह्या जिल्ह्यात असून शिक्षणाच्या दृष्टीने, सामान्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी परिपक्व व यशस्वी रित्या शिक्षक कर्मचारी स्टाफ वर्ग असल्याने येथील मुलांनी आपल्या शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. दहावी बोर्ड परीक्षा सुरू होत असल्याने दहावी बोर्ड परीक्षा म्हटलं कि,थोडी भीती वाटणे व ताण येणे स्वाभाविक आहे. परंतू वेळेचे व्यवस्थापन, नियोजन बध्द अभ्यास व तब्येतीची काळजी घेऊन आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जा यश संपादन करा असे श्री.केदारेश्वर माध्यामिक विद्यालयातील शिक्षक स्टाफ कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यींना मन.पूर्वक शुभेच्छा दिल्या.

‌आत्मविश्वासाने परिक्षेला यश प्राप्त होईल व यशावर काहींना करिअरच्या वाटा उपलब्ध होतील आणि यशाच्या शिखरावर आपले व शाळेचे नांव लौकीक करतील अशी अपेक्षा व्यक्त करत शाळेतील मुख्याध्यापक मुसुळे सर, कणसे सर,आघाव सर आदी शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत उपस्थित माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष गहिनीनाथ हुलूळे ,स्वप्नील मुसुळे, दिलीप झावरे, प्रवीण दुधाट आदी पालकवर्ग यांच्या उपस्थित दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!