अ.नगर प्रतिनिधी /शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कौठेमलकापूर येथील अमीनशहा बाबांच्या पावनभुमीत कौठेमलकापूर,दरेवाडी, रणखांब, आदी गावातील नागरिकांच्या सहकार्याने शिवरात्री व शिवजयंती निमित्ताने कौठेमलकापूर येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. सविस्तर माहिती अशी कि,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आदरणीय संगमनेर तालुका बाजार समितीचे सभापती आणि आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली कौठेमलकापूर येथे शिवजयंती निमित्ताने बैलगाडा प्रेमीच्या आग्रहाने बैलगाडा शर्यत आयोजित करून यशस्वी रित्या पार पाडण्यात आली.
अहमदनगर,पुणे,औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमी यांनी आपापल्या बैलगाडा सह आपली उपस्थिती दाखवत बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात यशस्वी करत कौठे मलकापूर येथील बैलगाडा शर्यतीत आपला ठसा उमटवला. कौठेमलकापूर, रणखांब, दरेवाडी पंचक्रोशीतील जनतेने आपल्या सहकार्याने व एकत्रित येत बैलगाडा शर्यतीत येणाऱ्या रसिकांचे स्वागत केले.बैलगाडा शर्यतीत विजेता उमेदवारांना विजयी घोषित करत अभिनंदन व्यक्त केले.यावेळी उपस्थित संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, मिराताई शेटे,भाऊसाहेब परचंडे,नामदेव खेमनर, जयराम ढेरंगे,व साकूर पठार भागातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
Leave a reply