Disha Shakti

Uncategorized

माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नांतून चिखलठाण येथे नवीन उपकेंद्राला मंजुरी

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या ताहाराबाद 33 के व्ही.उपकेंद्रातून म्हैसगांव, चिखलठाण, शेरी,कोळेवाडी, दरडगांव थडी, ताहाराबाद, वाबळेवाडी,गाडकवाडी आणि तास या गावांना वीजपुरवठा ताहाराबाद उपकेंद्रातून केला जातो. महावितरणच्या ताहाराबाद येथील 33 के.व्ही. उपकेंद्रातील रोहित्रावर विद्युत पुरवठ्याचा भार जादा होत असल्यामुळे शेती वाहिनीवरील वीज ग्राहकांना दिवसाआड जादा भारनियम असल्याने शेती पिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने पिके धोक्यात आली असल्याने शेतकर्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे शेरी चिखलठाण येथील लोकनियुक्त व कार्यसम्राट सरपंच डॉ. सुभाष काकडे यांनी माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे वेळोवेळी चिखलठाण येथील नवीन उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला असता माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही  चिखलठाण येथील व ताहाराबाद येथ नवीन उपकेंद्रासाठी पाठपुरावा करून विस्तारीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून कामाचे कार्यरंभाचे आदेश मिळाले असून लवकरच या उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याने चिखलठाण येथील नवीन सबस्टेशमुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मिटणार असून भारनियमातून सुटका होणार असल्याची माहिती शेरी चिखलठाण येथील लोकनियुक्त कार्यसम्राट डॉ. सुभाष काकडे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी धोरण 2020 अंतर्गत पायाभूत सुविधा निधी वितरित करून निविदा प्रसिद्ध झालेल्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी केला,यामध्ये  चिखलठाण येथे नवीन उपकेंद्रासाठी 4 कोटी 20 लाख 72 हजार 855 रुपये तसेच ताहाराबाद येथील उपकेंद्रातील क्षमता वाढविण्यासाठी 84 लाख 72 हजार 327 रुपये एवढ्या रकमेच्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!