प्रतिनिधी / रावसाहेब पाटोळे : बाभुळगाव आज दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी राहुरी तालुक्यातील बाभूळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद बाजार भरविण्यात आला होता. या आनंद बाजार च्या माध्यमातून मुलांना एक चांगल्या प्रकार चा अभिनव उपक्रम पाहण्यास मिळाला. तसेच मुलांच्या व्यावहारिक ज्ञानात चांगल्या प्रकारची भर पडेल व व्यावहारिक ज्ञान माहिती होण्यास मदत होईल. आनंद बाजार च्या माध्यमातून मुलांना एक चागल्या प्रकारे शिकवण अंगवळणी पडले यात काही शंका नाही.
![]()
आनंद बाजार मध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच गावातील सर्व पालक वर्ग व महिला वर्गानी या उपक्रमामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होऊन या चिमुरड्या मुलांनाचा आनंद द्विगुणित केला.
या वेळी गावातील सरपंच मुक्ताबाई गिऱ्हे, उपसरपंच सविता पाटोळे, अनिल वाघमारे, गोरक्षनाथ तमनर अशोक उंडे, रामदास कोतकर, अनिल थोरात , ज्ञानदेव पाटोळे, ह. भ.प. रामेश्वर वाघमोडे, बाळासाहेब थोरात तसेच नांदगाव चे सरपंच श्री. सखाराम सरक, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, गावातील सर्व पालक वर्ग, आदी उपस्थित होते.
Leave a reply