Disha Shakti

Uncategorized

नगर दक्षिण लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी पै रावसाहेब( नाना ) खेवरे यांची निवड झाल्याबद्दल गोटूंबे आखाडा येथील उ.बा.ठा. शिवसैनिकांच्या वतीने सत्कार

Spread the love

राहुरी तालुका प्रतिनिधी / दत्तू पुरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नगर दक्षिण लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी पै रावसाहेब (नाना ) खेवरे यांची नुकतीच निवड झाली आह़े. यापूर्वी पै. रावसाहेब नाना खेवरे हे उत्तर जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून काम पाहत होते त्यांच्या या प्रमुख पदावरून त्यांनी उत्तर भागामध्ये मोठा संपर्क उभा करून यावेळी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी लोकसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेच्या वतीने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रावसाहेब खेवरे यांचे मोठे सहकार्य व योगदान लाभले होते. तसेच प्रत्येक गावोगावी शाखा स्थापन करून शिवसैनिकांची मोठी फळी तयार केली होती या सर्व गोष्टीचा अभ्यास करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्यांचे काम पाहून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सह संपर्कप्रमुख पदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे.पै.रावसाहेब (नाना) खेवरे यांची शिर्डी लोकसभा सह संपर्कपदी निवड झाल्याबद्दल गोटूंबे आखाडा येथील शिवसैनिकांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार समारंभ करण्यात आला.

यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. ह.भ. प. श्री.अशोक महाराज शेटे यांच्या हस्ते शाल गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोटुंबा आखाडा येथील शिवसैनिक रामदास खेमनर, नंदू हरिचंद्रे, रवींद्र चौधरी, मन्सूर शेख, दिपक शेडगे, सुनील शेवाळे, मोहन खैरे, सोमनाथ पागिरे, नवनाथ चौधरी, रुतिक गुंजाळ, मंगेश शेटे, नवनाथ शेटे, ऋषिकेश जगताप, ओम पुरी, प्रशांत भंडारे, सुरज पोटे, ओंकार खेवरे सह आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!