Disha Shakti

Uncategorized

कांतीलाल जाडकर यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 चा पुरस्कार प्रदान

Spread the love

प्रतिनिधी / अंबादास काळे: नगर तालुक्यातील केडगाव येथील श्री कांतीलाल जाडकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदरील पुरस्कारा हा महाराष्ट्र राज्य पर्यटन कला सांस्कृतिक मुंबई महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन व मैत्रीण उद्योग ग्रुप लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चैनल नेटवर्क एस पी नाईन न्यूज मराठी न्यूज इंटरनेट नेटवर्क गायत्री फाउंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार देण्यात येत असतात. त्याच निमित्ताने 2023 चे पुरस्कार वितरण सोहळा आचार्य अत्रे रंगमंदिर वल्लभनगर पिंपरी चिंचवड येथे पडला.

या कार्यक्रमास प्रमूख पाहुणे व उद्घाटक सौ. संगीता डावखर कमिशनर अतिरिक्त समाज कल्याण विभाग, श्री.शेखर शिंदे साहेब मंडल अधिकारी पिंपरी चिंचवड, भास्कर मधुकर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस ठाणे, रवींद्र बाबुराव भिडे पोलीस उपनिरीक्षक पुणे लोहमार्ग, दिपाली दयाराम बच्छाव तलाठी पिंपरी चिंचवड, उषाताई वाडेकर उपमहापौर, पुणे महानगरपालिका, चिंचवड, परशुराम वाडेकर सचिव रबलीकंद पार्टी ऑफ इंडिया, बाबासाहेब ढसाळ राज्य’निवडणूक प्रमुख, बबन जोगदंड विभाग प्रमुख यशदा बाणेर रोड, श्री.एस.एम. देशमुख, व इतर प्रमूख मान्यवरांच्या उपस्थितीत कांतीलाल जाडकर यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आह़े.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!