अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : मुळा धरण राहुरी येथे माजी आमदार व मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते वांबोरी चारीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. वांबोरी चारी लवकरच सौर ऊर्जेवर कार्यन्वित करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. वांबोरी चारीला वेळोवेळी शासनाचा निकष बदलून निधी उपलब्ध करून योजना सुरू करण्याचे सातत्याने परिपूर्ण करण्याचे काम माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. टेल टू हेड नुसार शेतकर्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सरकारच्या माध्यमातून लवकरच वांबोरी चारी तसेच अहमदनगर येथील बुर्हानगर व इतर 72 गावांच्या पाणीपुरवठा योजना ह्या सौर ऊर्जेवर कार्यन्वित करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती दिली.
माजी आमदार शिवाजीराव कर्डीले म्हणाले कि,राहुरी मतदारसंघात आपण विजयी झाल्यापासून सातत्याने वांबोरी चारी सुरु राहण्यासाठी प्रयत्न करीत राहिलो असून महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महामंडळाकडून 81% निधी ,शेतकरी सहभाग 19% या नुसार योजना राबविण्यात आल्या असून त्या सुरु आहेत. यावेळी उपस्थित खासदार डॉ. सुजय विखे पाटील,जेष्ठ नेते सुभाष पाटील,जिल्हा बैकेचे संचालक अंबादास पिसाळ,तनपुरे कारखान्याचे नामदेव ढोकणे,माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील,रावसाहेब चाचा तनपुरे, आर.आर.तनपुरे,सुरेश बानकर,अमोल भनगडे, सुभाष गायकवाड,कार्यकारी अभियंता सायली पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वांबोरी चारीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.
Leave a reply