राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ : राहुरी येथील पिंपळाचा मळा नूतन मराठी शाळा नंबर 8 मध्ये सोनई च्या सहा मित्र एकत्रित येत आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून शाळेसाठी खेळणी,घसरगुंडी शिडी, एक फॅन, शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले.कै. शुभम रघुनाथ तनपुरे हा अल्पशा आजाराने त्याचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले होते.असे असताना त्याचा दिनांक 27 फेब्रुवारीला शुभम चा वाढदिवसानिमित्त त्याचे मित्र परिवाराने संकल्प केला की आपण ज्ञानदानासाठी काहीतरी मित्राच्या स्मरणार्थ त्यांना ही संकल्पना सुचली त्यांनी राहुरी येथील शुभमच्या घराजवळ असणारी नूतन मराठी शाळा न 8पिंपळाचा मळा या शाळेची निवड केली.
यावेळी वैभव खराडे संकेत बढे आकाश साळवे आशुतोष चौधरी जंगले ऋतिक योगेश हरिचंद्र व शुभम चे दाजी स्वप्निल खर्डे यांनी दिवसभर वेळ देऊन या सर्व वस्तू शाळेकडे देण्यात आले शुभम ला लहानपणापासून लहान मुलांची खूप आवड होती त्यामुळे त्याच्या आठवणींना नेहमीच उजाळा मिळावा या संकल्पनेनेच सोनईच्या मित्रांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हरळ मॅडम राठोड सर व शालेय शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेंद्र तनपुरे, योगेश कटारे, महेश तनपुरे, सत्यम तनपुरे, गोरख तनपुरे, बाळासाहेब तनपुरे, संतोष तनपुरे, कुणाल तनपुरे उपस्थित होते. खेळणी बघून शाळेतील मुलं आनंदाने कुतूहलाने पाहत होते.
Leave a reply