प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोजताई अहिरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ५ महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या असता त्यांना हिरकणी कक्षात असुविधाना तोंड द्यावे लागले. त्यानंतर, आरोग्यमंत्र्यांनी येत्या २४ तासात सुसज्ज असा हिरकणी कक्ष उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, मंत्री तानाजी सावंत यांनी स्वत: जातीनं लक्ष देत हिरकणी कक्षाचा चेहरामोहराच बदलला. विशेष म्हणजे, आज त्या ५ महिन्यांच्या बाळाला घेऊन स्वत: मंत्रीमहोदय हिरकणी कक्षात दाखल आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.
विधापरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड-पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज ताई व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला. अर्थाचच, आई म्हणून संतापलेल्या सरोजताईंना आई म्हणून बाळासाठी उपलब्ध झालेल्या सुविधांचा अत्यानंद झाला. यावेळी, त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले. इतिहासाच्या पानात पाहिल्यास हिरकणी आणि तानाजी या दोन्ही नावांचा मोठा इतिहास आहे.
आज, विधिमंडळातील हिरकणी अन् तानाजींच्या गोष्टीने अनेकांच्या डोळ्याच्या ‘कडा’ पाणावल्या दरम्यान, आगामी काळात महिला पोलिसांसाठी असे हिरकणी कक्ष उभारण्याचा मानसही आरोग्यमंत्री मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
Leave a reply