Disha Shakti

Uncategorized

तास वनकुटे येथील शाळेय विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व खासदार. डॉ सुजय दादा विखे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त टिफिन बॉक्सचे वाटप

Spread the love

प्रतिनिधी/गंगासागर पोकळे : तास वनकुटे या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्याचा आमृत महोत्सव व आपल्या जिल्ह्यचे डॉक्टर खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत जेवणासाठी डबे वाटप करण्यात आले .

यावेळी, खासदार साहेबांचे जनसेवा संपर्क कार्यालय पारनेरचे प्रमुख प्रा. शेळके एस एन साहेब, तसेच माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य भास्करराव शिंदे पाटील वनकुटे व वनकुटे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व मार्गदर्शक भानदास गागरे साहेब, शेळके साहेब, चौरे साहेब,कारभारी खामकर साहेब, गोपीनाथ गुंजाळ, पोपटराव मेंगाळ, भास्करराव पठारे, छबु साळवे, गणपतराव काळनर, श्रीकांत डुकरे, शिक्षक नवले सर, झरेकर सर, हारदे सर,सुनिल खामकर दादाभाऊ नवले कांबळे मॅडम झावरे मॅडम राजेंद्र डहाळे – शा.व्य.स. अध्यक्ष, साहेबराव कदम, शौकत शेख,अभय गोसावी, धुमाळ मॅडम, बाळासाहेब पायमोडे, संदीप सुबे, आनंदा झरेकर, बाबासाहेब हारदे,प्रकाश केदारी, आढाव मॅडम,अशोक गागरे, मालूजी मंचरे, शिवाजी झावरे, यावेळी बोलताना भास्कर शिंदे म्हटले की माझ्या तास व वनकुटे परिसरातील सर्व नागरिकांना व आदिवासी समाज बांधवांना कुठलीही कमी पडू देणार नाही व खासदार सुजय विखे साहेब तसेच (मा. जि.प.उपाध्यक्ष) सुजित झावरे व बंडू रोहकले यांच्या सहकार्याने तास व वनकुटे परिसरात भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न करीन. आणि सर्व विद्यार्थी व. मान्यवरांच्या हस्ते डबे वाटप करण्यात आली आहे तसेच तास गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य भास्कर शिंदे व सर्व तमाम जनतेच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदांच्यावतीने लाडके खासदार सुजय दादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!