प्रतिनिधी / युनुस शेख : राहुरी शहरातील अहमदनगर मनमाड रस्त्यावर कांदा ओतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करत निषेध करण्यात आला. सविस्तर माहिती अशी आहे शेतकर्यांना वेळेवर वीजपुरवठा सुरळीत सुरु नसून शेतकरी आपले पिके हि आपल्या मेहनतीने व आर्थिक गुंतवणूक करत पिके लागवडीपासून ते काढणीपर्यत राब राबतो तरी त्याच्या हाती काही शिल्लक राहत नाही.
शेतकर्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून शेतीमालाला कवडीमोल किंमत असून सध्या कांदा पिके बाजारा अभावी शेतकरी चिंताग्रस्त होऊन कर्जबाजारी होत चाललेला आहे. शेतकर्यांना आपल्या पिकांना( कांदा उत्पादक शेतकरी ) यांना अडीच ते तीन हजारापर्यंत प्रतिकिंट्टल बाजारभाव मिळावा अशी विनंती व मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर अध्यक्ष रवींद्र मोरे पाटील यांनी केली असून जर शेतकर्यांना योग्य बाजार भाव न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा ईशारा करण्यात आला आहे. राहुरीत शहरातील अहमदनगर मनमाड रस्त्यावर कांद्याचे भाव पडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटना व तालुक्यातील पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला.
Leave a reply