Disha Shakti

Uncategorized

प्रा. होले यांचे मारेकरी सापडेना! समता परिषद आक्रमक

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : प्रा. शिवाजी किसन उर्फ देवा होले रा. जाधव पेट्रोल पंपाजवळ कल्याण रोड, नगर यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या खुनाला पाच दिवस उलटून गेले तरी अजूनही खुनी कोण? याचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. दरम्यान मारेकर्‍यांचा शोध लागत नसल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवदेन देण्यात आले असून मारेकर्‍यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रा.होले हे नगर शहरात राहत होते. ते श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. २३ फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर ते नातेवाईक अरुण नाथा शिंदे वय ४५ रा. नेप्ती ता. नगर यांच्यासोबत केडगाव बायपास येथील हॉटेल के ९ समोरील एका बंद ढाब्याजवळ दारू पित बसले होते. तेथे आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून प्रा. होले यांना पिस्तुलातून गोळ्या घातल्या. यात प्रा. होले यांचा मृत्यू झाला. लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी प्रा. होले यांचा खून केल्याची फिर्याद नातेवाईक शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गेल्या गुरूवारपासून तपास सुरू असून पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नाहीत. लुटमारी करणार्‍या काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे पोलिसांनी चौकशी केली. तांत्रिक तपास सुरू आहे. नाजूक कारण, व्यवहारीक कारणासह प्रा. होले यांचे कोणासोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडला का? अशा सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. शेवटी लुटीच्या उद्देशानेच हा प्रकार झाल्याचे अद्याप तरी पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. प्रा.होले यांचा खुनी शोधण्यात पोलिसांना यश येत नसल्याने नातेवाईकांसह मित्र परिवारांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन लवकरात लवकर खुनी शोधण्याची मागणी केली आहे. दरम्यान लवकर प्रा.होले यांचे मारेकरी सापडतील, असे आश्वासन अधीक्षक राकेश ओला यांनी समता परिषदेचे पदाधिकारी व नातेवाईकांना दिले आहे.

यावेळी समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाअध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव, रामदास फुले,शाहुराजे होले, सरपंच संजय जपकर, वसंतराव पवार, अंबादास पुंड, एकनाथ होले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, भाजपचे अभय आगरकर, संभाजी कदम, किशोर डागवाले, जालिंदर बोरूडे, धनंजय जाधव, अनिल बोरूडे, भरत गारुडकर, निखिल शेलार,प्रा माणिकराव विधाते, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!