प्रतिनिधी / शेख युनुस : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या अखेर राज्यसरकारकडून मान्य करण्यात आल्या. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात 1500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अंगणवाडी सेविका ताई यांना मोबाईल दिला जाईल त्याच बरोबर पेंशन योजनांचा लाभ मिळेल. महाराष्ट्र राज्याच्या अंगणवाडी कृती समीतीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातून सोमवार पासून बेमूदत संप पुकारला होता त्याची दखल घेत राज्यसरकारकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचारी महिलांना ,सेविका यांना वेतनश्रेणी लागू करणे, त्याच प्रमाणे मानधनात वाढ करून नवीन मोबाईल उपलब्ध करण्यात यावे तसेच पेंशन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. दरम्यान या काळात राज्यातील अंगणवाडी केंद्र बंद करून महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी महिला या संपात सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी सेविकांच्या या संपाचा फटका लाखो बालकांना बसत होता. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होते,त्याच बरोबर गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी अंगणवाडी कार्यक्रमांवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसताच त्यावर राज्य सरकारने तातडीने चर्चेची भूमिका घेतली आणि मागण्या मान्य केल्या.
Leave a reply