प्रतिनिधी / शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील हनुमान रायांच्या पवित्र भुमीत संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे 53 वे वर्ष आहे. या सप्ताहाचा प्रारंभ दि. 3 मार्चपासून होणार असून सांगता 10 मार्चला ह.भ.प चत्तर महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तसेच सप्ताह काळात मठाधिपती ह.भ.प. दत्तगिरी महाराज वरवंडीकर, शिवाजी महाराज दाते शिवचरित्रकार, मारुती महाराज अनंत कासारे, दिपक महाराज गुळवे, शांताराम महाराज जोरी, अमोल महाराज गांगुर्डे, दत्तात्रय महाराज भोर, उध्दव महाराज कोतवाल यांची किर्तनसेवा होणार आहे. तसेच सप्ताह काळात दैनंदिन काकडा, भजन, हरिपाठ, गाथा पारायण आदी कार्यक्रम होणार आहे. तसेच या सप्ताहाच्या अन्नदानाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a reply