राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तसेच बनावट आजार दाखवून बदल्या झाल्या असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ विजय मकासरे यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली हाेती. त्यावर प्रशासनाकडून त्या तक्रार अर्जाची दखल घेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची तसेच आजारांची चाैकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
पडताळणीचे आश्वासन
अहमदनगर जिल्ह्यात संवर्ग एक मध्ये २९९ दिव्यांग शिक्षकांच्या बदल्या बनावट प्रमाणपत्र देऊनच झाल्या असल्याची तक्रार डॉ विजय मकासरे प्रशासनाकडे केली हाेती. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने तक्रारीची दखल घेत बदली झालेल्या सर्व २९९ दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
HomeUncategorizedत्या’ गुरुजींच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार पडताळणी ! डॉ विजय मकासरे यांच्या मागणीला यश
त्या’ गुरुजींच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार पडताळणी ! डॉ विजय मकासरे यांच्या मागणीला यश

0Share
Leave a reply