Disha Shakti

Uncategorized

कसबा पेठ विधान सभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र आण्णा धंगेकर 11040 मतांनी विजयी!शेवटपर्यंत गोरगरिबांची कामे करणार रवींद्र अण्णा धंगेकर यांचे प्रतिपादन

Spread the love

पुणे प्रतिनिधी / किरण थोरात : कसबा पेठ विधान सभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र अण्णा धंगेकर याचा 11040 मतांनी विजयी झाला असून त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने याचा पराभव केला आहे महविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र आण्णा धंगेकर यांना एकूण 72599 मत तर भाजपा चे उमेदवार हेमंत रासने यांना एकूण 61771 मते मिळाली आहेत.

धंगेकर हे मूळचे बारामती लोकसभा मतदासंघातील दौंड तालुक्यातील नाथाचीवाडीचे रहिवाशी त्याचे रविंद्र आण्णा चे वडील हेमराज यांचे मूळचे आडनाव झाडगे पण ते धगेकर कुटुंबात दत्तक गेले रविंद्र आण्णा यांचा जन्म नाथाचीवाडी ठिकाणी झाला कालांतराने ते कामानिमित्त पुण्यात स्थायीक झाले सुरवाती च्या काळात ते शिवसेना पक्षातून दोन वेळा नगरसेवक झाले नंतर ते राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात प्रवेश केला व तिथे ही ते दोन वेळा नगरसेवक झाले.परंतु मनसे पक्ष सोडून पुढची निवडणूक ते अपक्ष उमेदवार म्हणून लढले व निवडून ही आले गेली 25 वर्ष ते नगरसेवक आहेत आणि म्हणून त्याच्या मुळ गावी ग्रामस्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणा बाजी करत गुलाल व भंडारा उधळून फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला मनसे नेते उपाध्यक्ष संदिप गडदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!