Disha Shakti

Uncategorized

राजेंद्र बैरागी यांची कोळेवाडीच्या सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड.

Spread the love

धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील साधारण दीड हजार लोकसंख्या असलेल्या कोळेवाडी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी हैबत बुवा महाराज पॅनलचे राजेंद्र बैरागी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.12 फेब्रुवारी रोजी झालेल्या अत्यंत चुरशीच्या मतदाना दिवशी दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी झाली.त्या प्रकरणी एकमेकांविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात सुमारे 30 जनावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.हैबत बुवा महाराज पॅनलचे 13पैकी 11 सदस्य निवडून आले तर विरोधी पक्षाचे दोन सदस्य निवडून आले होते.

एक मार्च रोजी झालेल्या चेअरमन पदाच्या निवडीत राजेंद्र बैरागी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस कस्तुरे, ए .टी सोलंकर ,एन. बी एडके , प्रभाकर नाईकवाडी यांनी काम पाहिले. यावेळी नूतन संचालक रामकिसन अकोस्कर, श्रीकृष्ण अकोस्कर, भरत अकोस्कर , श्रीराम व्हरकटे, ज्ञानोबा आदटराव ,राजेंद्र आदटराव, हनुमंत वाघ, मदन माने, कांताबाई अकोसकर, बालाजी माने ,पद्माकर आदटराव व दादासाहेब अकोस्कर यांची उपस्थिती होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!