Disha Shakti

Uncategorized

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करा माळी महासंघाची अर्थमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक संदर्भात विधिमंडळात वारंवार चर्चा होत आहे. सरकारही जमीन अधिग्रहणाची तारीख देत आहे. त्यामुळे आश्वासन मागणारे आणि तारीख देणारे दोघेही आमची दिशाभूल करत आहेत. तरी भिडे वाडा या राष्ट्रीय स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ५० कोटींची तरतूद करण्याची मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रधान सचिव भूषण गगराणी व पुणे मनपा आयुक्त राव यांच्या उपस्थित बैठक लावण्यात आली. त्यानूसार या जागेचे असलेले मालक व व्यवसायिक यांना न्यायालयात मोबदला मिळावा, या करीता दावा दाखल केला आहे. त्या चर्चेनुसार सरकार मोबदला देत असतील तर दावा मागे घेण्यास तयार आहेत असे ठरले.

दरम्यान, भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी सन २०१५ पासून माळी महासंघ सातत्याने पाठपुरावा करीत असून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद करण्याची मागणी माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर, जिल्हा अध्यक्ष सतीश चोपडा, जिल्हा महिला अध्यक्ष संध्या देशकर, विभागीय उपाध्यक्षा दुर्गा भड,शहर उपाध्यक्ष प्रभाकर बोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक खलोकार,सहकार प्रदेश अध्यक्ष संदीप भुस्कुट, विभागीय उपाध्यक्ष झाडे,विधी जिल्हाअध्यक्ष ऍड प्रवीण करुले, वासुद,व लोखंडे सुधीर मनसे, प्रशांत गाजरे, रंजना मेहेर,निलाक्षी, गाजरे,माधुरा धनोकार, ईर्षा बोबडे, मोहन बेलसरे, नंदकिशोर बोबडे, उमाकांत चिंचोलकर, दिपक मेहेर, माळी महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बनकर माळी महासंघाचे अधिकारी व पदाधिकारी आदींनी केली आहे.

वास्तू जीर्णावस्थेत!
भारतातील स्त्री शिक्षणाची सुरुवात १७५ वर्षापुर्वी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाडा या वास्तूमधून झाली. आज सदर वास्तू अतिशय जीर्णावस्थेत आहे. या जागेचा ताबा काही व्यवसायिक व काही जागेच्या मालकाकडे आहे. सन २०१५ पासून आम्ही सतत या विषयाचा पाठपुरावा करत असून या पाठपुराव्यामुळे २०१८ मध्ये भिडे वाडा पुरातन वास्तू घोषित झाली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!