Disha Shakti

Uncategorized

परीट समाजाला गाढवाच्या साह्याने रेती काढण्याचा परवाना द्यावा, डेबोजी क्रांती दलाची मागणी

Spread the love

नायगाव प्रतिनिधी /साजीद बागवान : नायगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या जवळ अनेक गावी आहेत आणि त्या प्रत्येक गावात परीट समाज आजही हलाखीचे जीवन जगतो म्हणून त्यांना गाढवाच्या साह्याने रेती काढण्याचा परवाना देण्यात यावा अशी मागणी डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी यादवराव ईबितदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

एखादा भांडवलदार यावे आणि शासनाच्या gनियमाप्रमाणे पैसे भरावे आणि जेसीबी हायवा, टिप्परच्या साह्याने गोदावरी नदीपात्रातील भरमसाठ रेतीचा उपसा करावा असे आजवर चालत आलेले आहे परंतु गोदावरी नदीच्या जवळ अनेक गावे नायगाव तालुक्यातील आहेत त्या प्रत्येक गावात परीट समाज हलाखीचे जीवन जगत आहे आणि म्हणून त्यांना रोजंदारी मिळण्यासाठी गाढवाच्या साह्याने रेती काढण्याचा परवाना देण्यात यावा अशी मागणी डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी यादवराव ईबीतदार कुंटूरकर यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!