Disha Shakti

Uncategorized

श्रीरामपूर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना वेगाने सुरवात

Spread the love

 

श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : ग्रामीण भागाचा विकास होण्याकरीता दळणवळणाची साधने, रस्ते चांगली हवीत. ग्रामीण भागाची प्रगती होण्याकरिता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघात रस्त्याची वेगाने कामे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद़्गार माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी काढले. बेलापूर हद्दीतील गायकवाड वस्ती सुभाषवाडी वळदगाव या दिड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकर अंदाजीत रुपये ४० लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभांरभ माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्यावेळी बोलताना कानडे म्हणाले, या रस्त्याच्या कामासंदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी वांरवार पाठपुरावा केला होता. आमदार लहु कानडे यांनी मतदार संघातील सर्व रस्ते दुरुस्त करण्याचा चंग बांधला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक म्हणाले, की आमदार लहु कानडे या तालुक्याचे लोकप्रतिनीधी झाल्यापासुन श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. यावेळी बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हाणाले, सुभाषवाडी वळदगाव या नागरीकासाठी श्रीरामपूरकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. विद्यानिकेतन शाळेत १५०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असून हा रस्ता दुरुस्त व्हावा, अशी पालकांची अनेक दिवसापासुन मागणी होती. ही मागणी आमदार लहु कानडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ या रस्त्याच्या कामास ४० लाख रुपयांचा निधी दिला. बेलापुर ते श्रीरामपुर या रस्त्याच्या कामास आमदार कानडे यांनी १६ कोटी रुपये दिले असल्याचे नवले यांनी सांगितले.

यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, श्रीकृष्ण ताम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी डाँ. राजीव शिंदे, प्राचार्य शेळके , किशोर नवले, अशोक भोसले, प्रमोद भोसले, दिपक निंबाळकर , माजी सभापती दत्ता कुऱ्हे , व्हा .चेअरमन पंडीतराव बोंबले, गणेश राशिनकर परिक्षित नवले , विपुल नवले सागर नवले, अशोक नवले, संजय नवले, महेश खंडागळे, वैष्णव साळवे संदीप नवले आदिसह विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!