Disha Shakti

Uncategorized

वादग्रस्त ग्रामसेवक मुदखेडेना निलंबन करण्यासाठी सी.ओ.कडे तक्रार! आमरण उपोषण करण्याचा इशारा

Spread the love

नायगाव प्रतिनिधी : साजीद बागवान : तालुक्यातील मौजे अंचोली पिंपळगाव औराळा येथे कार्यरत असलेले वादग्रस्त ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी तक्रारी निवेदन गटविकास अधिकारी यांच्याकडे देऊनही कुठलीच कारवाई न झाल्याने नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मुदखेडेच्या निलंबनासाठी डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी ईबीतदार यांनी निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

वृत असे की, तालुक्यातील मौजे मरवाळी येथील रहिवासी असलेले ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी मौजे अंचोली पिंपळगाव औराळा येथे कार्यरत आहेत. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अंचोली ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पायात बूट घालून पुष्पहार टाकून पूजन केले तेथील प्रकार सर्वांना सोशल मीडियाद्वारे कळताच अनेक शिवप्रेमी मुदखेडे यांच्या विषयी रोष व्यक्त केला तर अनेकांनी कार्यवाही करण्यासाठी तक्रार केली बातम्या देखील अनेक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या होत्या परंतु नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कुठलीच कार्यवाही केली नाही अशा वादग्रस्त ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचे कारण तरी काय असावे असा प्रश्न पुढे येत आहे.

मुदखेडे हे आंचोली पिंपळगाव औराळा या गावातील गोरगरीब लोकांकडून नमुना नंबर आठ रजिस्टरला प्लॉट लावण्यासाठी जास्तीचे पैसे उकळतात तर विधवा महिला व गोरगरीब महिलांच्या मजबुरीचा फायदा देखील उचलतो कारण नुकताच एक बाई सोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे असेही या तक्रारी निवेदनात नमूद केले आहे. मुदखेडे हे कर्मचारी असताना देखील बोलीभाषेचा कसा वापर करावा, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांना उद्धट पणाची भाषा सरासपणे वापरतो असेही निवेदनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात तक्रार केली आहे. अशा विविध प्रकरणात वादग्रस्त असलेले ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांची चौकशी करून तात्काळ निलंबन करावे अन्यथा आपण विविध सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी ईबीतदार कुंटूरकर यांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!