प्रतिनिधी / गंगासागर पोकळे (अकोले) : पिंपळगाव नाकविंदा येथील आढळवाडी या छोट्याशा वाडीमध्ये ,अखिल मानवता व सामाजिक सहिष्णुता व विश्वात्मक भावनांचा प्रसार होऊन प्रत्येकास आंतरिक समाधान मिळावे म्हणुन सालाबादप्रमाणे याही वर्षी मौजे पिंपळगांव नाकविदा आढळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता, ही सात दिवस चालू असलेली सेवा की आज सप्ताहाचा आज शेवटचा दिवस म्हणजे काल्याचे किर्तन त्या निमित्ताने ह.भ.प उद्धव महाराज बिराजदार (आळंदीकर) यांचे कीर्तनरुपी सेवेत संपन्न झाला.
आज सकाळी काल्याचे किर्तन निमित्त सकाळी आठ वाजता दिंडी सोहळा व सात दिवस चालू असलेला हा सप्ताह काळामध्ये दररोज संध्याकाळी सात ते आठ या काळामध्ये जसे की हरिपाठ व्हायचा व त्यानंतर अन्नदान व कीर्तन सेवा संपन्न व्हायचे तरी या काळामध्ये दररोज रात्री हरी जागर साठी पिंपळगाव व परिसरातील पिंपरकणे, बाभुळवंडी, शेरनखेल, कोंभाळणे, केळुंगण, देवगांव, डोंगरवाडी, पोपेरेवाडी, नायकरवाडी, मुथाळणे, म्हाळुगी, पाडोशी, कोकणवाडी, एकदरे, शिळवंडी घोटी, चंदगीरवाडी व बाल हरिपाठ चिंचोंडी या सर्व गावातील भाविक व माळकरी यांच्या उपस्थितीमध्ये सात दिवस हरी जागर कार्यक्रम संपन्न झाला.
सदा सर्व काळ शिवाचे किर्तन। आनंद नर्तन भेदरहित.(श्री संत एकनाथ महाराज) यांच्या गोड वाणीतून गायलेले प्रमाणे आढळवाडी येथील सप्ताहाला आज 28 वर्षे परिपूर्ण झाले, व सर्व पिंपळगाव व पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित सप्ताह सोहळा संपन्न झाला.
Leave a reply