श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी गावातील जागृत देवस्थान हनुमान मंदिराकडे श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती व श्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्ष मा. दीपक अण्णा पटारे साहेब (कारेगाव) यांच्या विशेष प्रयत्नातून ही गाय वासरूची सुसज्ज अशी प्रतीमेसाठी मदत व गावातील आदर्श शिक्षक श्री. संजय रेवाळे पाटील यांनी 5000 रुपयेच मदत व गावातील शाळेमधील कमलपुरचे आदर्श शिक्षक श्री.पवार सर यांनी 5000 रुपयेच मदत केली. हरी नामाच्या गजरात वाजवत गाजवत मिरवणूक काढून बसविण्यात आली आहे , ही गाय वासरू दि.4 मार्च 2023 रोजी सायंकाळी ठीक 5:00 वाजता* आपल्या गावातील कमानी पासून गावातील हनुमान भजनी मंडळ यांच्या टाळ – मृदुंगाच्या गजरात गाईची मिरवणूक काढण्यात आली, गावातील मिरवणूक मार्गावर पाणी मारून सडा व रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले.
या मिरवणुकीसाठी गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग व पत्रकार बांधव तसेच जय श्रीराम फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ,तद्नंतर मंदिराच्या प्रांगणात नवीन बांधलेल्या कुटीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने गावातील संजय रेवाळे (सर)व सपत्नीक यांच्या हस्ते ही पूजा-अर्चना करून ही गाय बसविली , ही शास्त्र शुद्ध पूजा करण्यासाठी संतोष मुळे (गुरू) हे उपस्थित होते, तदनंतर खिरापत प्रसादाचे वाटप करण्यात आले ,कुटिमध्ये सिमेंट काँक्रिट करून गायीचा साचा फिट केला आह़े. या गाईच्या शेजारी जय श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अनिल चितळकर व सर्व स्वयंसेवक यांच्या अधिपत्याखाली सुसज्ज असे गार्डन लॉन बसविण्यात आले आहे, तसेच मंदिर परिसरात आकर्षक असे शोभेची झाडे बसविण्यात आले.
यासाठी सर्व स्वयंसेवकांनी उद्या आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिले होते.तसेच या गाय वासरूच्या अनावरण कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण महंत स्वामीजी प्रकशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते लवकरच अनावरण कार्यक्रम होणार आहे. व नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.या कार्यक्रमासाठी गावातील पत्रकार महेश दत्तात्रय मासाळ हे उपस्थित होते.
Leave a reply