अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनुस : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील पांडुरंग लॉन्स जनता दरबार घेऊन नागरीकांचे प्रश्न जाणून घेतले.याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, राहुरी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, राहुरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ, सुभाषराव पाटील, दादा पाटील सोनवणे, आसाराम पा.ढूस, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सत्यजीत कदम, रावसाहेब तनपुरे, यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब जनता दरबाराच्या निमित्ताने आज राहुरी तालुक्याच्या सर्व जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी आले होते.
यावेळी अनेक नागरीक आपापल्या तक्रारी घेऊन आले होते. तसेच अनेक नागरिकांनी अर्जाद्वारे आपल्या समस्या महसूल मंत्री यांना मांडल्या व सर्व अर्ज काळजीपूर्वक पाहून त्यावरती योग्य ती दखल घेऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील माजी मंत्री माननीय श्री शिवाजीराव कर्डिले साहेब व तालुक्यातील तमाम कार्यकर्ते साहेबांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
Leave a reply