अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा रस्ता कित्येक दिवसांपासून मरणयातना भोगत होता. अनेक वर्षांपासून प्रवासी या रस्त्याने ये जा करणे टाळत होते. आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात यांस वाढीव निधी प्राप्त झाला. पालकमंत्र्यांनी या रस्त्याची दुरवस्था ओळखून या रस्त्याची काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेशीत केले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून काम सुरु झाले. हे काम सुरु झाल्यानंतर या कामात कुचीरता येताना दिसत आहे. अधिकारी वर्गाची दुर्बल मानसिकता बघता हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरु आहे.
या रस्त्याची आवश्यकता असलेले नागरीक अतिशय त्रस्त झालेले आहे. त्याचबरोबर साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी या रस्त्याची दुरवस्था बघता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱना जाब विचारला आहे. सदर काम करणारा ठेकेदार हा आपल्या राजकीय ताकदीच्या जोरावर बिनधास्त भ्रष्ट पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला आहे.
खडी टाकत असताना अगोदर डांबर ओतने क्रमप्राप्त असते पण असे न करता या ठेकेदाराने सरळ खडी ओतून देत डांबर वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिल इघे यांनी उपस्थित सुपरवायझर यांना विचारले असता डांबरांचा टंकर फेल झाला आहे म्हणून डांबर ना टाकताच खडी पसरवत आहोत. टंकर आला की पुढील भागात डांबर टाकू असे वायफळ उत्तर देत भ्रष्टाचार करत असल्याचे एक प्रकारे कबूलच केले असल्याचे सुनिल इघे यांनी सांगितले. हा रस्ता अतिशय निकृष्ट प्रतीचा बनत असुन सदर कामाची तात्काळ चौकशी व्हावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असा इशारा इघे यांनी दिला आहे
दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा रस्ता कित्येक दिवसांपासून मरणयातना भोगत होता. अनेक वर्षांपासून प्रवासी या रस्त्याने ये जा करणे टाळत होते. आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात यांस वाढीव निधी प्राप्त झाला. पालकमंत्र्यांनी या रस्त्याची दुरवस्था ओळखून या रस्त्याची काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेशीत केले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून काम सुरु झाले. हे काम सुरु झाल्यानंतर या कामात कुचीरता येताना दिसत आहे. अधिकारी वर्गाची दुर्बल मानसिकता बघता हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरु आहे.
या रस्त्याची आवश्यकता असलेले नागरीक अतिशय त्रस्त झालेले आहे. त्याचबरोबर साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी या रस्त्याची दुरवस्था बघता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱना जाब विचारला आहे. सदर काम करणारा ठेकेदार हा आपल्या राजकीय ताकदीच्या जोरावर बिनधास्त भ्रष्ट पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला आहे.
खडी टाकत असताना अगोदर डांबर ओतने क्रमप्राप्त असते पण असे न करता या ठेकेदाराने सरळ खडी ओतून देत डांबर वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिल इघे यांनी उपस्थित सुपरवायझर यांना विचारले असता डांबरांचा टंकर फेल झाला आहे म्हणून डांबर ना टाकताच खडी पसरवत आहोत. टंकर आला की पुढील भागात डांबर टाकू असे वायफळ उत्तर देत भ्रष्टाचार करत असल्याचे एक प्रकारे कबूलच केले असल्याचे सुनिल इघे यांनी सांगितले. हा रस्ता अतिशय निकृष्ट प्रतीचा बनत असुन सदर कामाची तात्काळ चौकशी व्हावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असा इशारा इघे यांनी दिला आहे.
Leave a reply