Disha Shakti

Uncategorized

जागतिक महिला दिना दिवशी घारगावच्या सरपंच पदी मा. आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध निवड

Spread the love

करमाळा प्रतिनिधी / प्रवीण शिनगारे : घारगाव ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच पदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. घारगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ८ मार्च रोजी निवडणूक झाली या निवडणुकीत सौ लक्ष्मी संजय सरवदे यांचा यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जगताप-शिंदे गटाचे उपसरपंच सतीश पवार तसेच मा. आ.नारायण आबा पाटील गटाचे इतर सर्व सदस्य यामध्ये माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, सदस्य आशा देशमुखे ,माजी सरपंच अनिता भोसले, सदस्य दत्तात्रय मस्तुद सर्वजण उपस्थित होते या सर्वांनी सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली आहे. निवड ८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी घेण्यात यावी. अशी लेखी मागणी सर्व सदस्यांनी माननीय तहसीलदार समीर माने साहेब यांचेकडे केली त्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांनी या निवडीसाठी परवानगी दिली.

या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर साहेब यांनी काम पाहिले. सोबत तलाठी मयूर क्षिरसागर साहेब तसेच सहाय्यक सोमनाथ खराडे घारगावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले. तसेच यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष एडवोकेट मा. शशिकांत नरुटे तसेच मा. सरपंच किरण दादा पाटील मा. सरपंच कल्याण दादा होगले व ग्रामस्थ उपस्थित होते.

घारगाव ची सरपंच निवड ८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी प्रशासनाने घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी माननीय तहसीलदार समीरजी माने साहेब तसेच मंडळ अधिकारी अनिल ठाकर साहेब तलाठी भाऊसाहेब श्री मयूर क्षिरसागर व सहाय्यक सोमनाथ खराडे यांचे आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!