जेऊर : महिला सशक्तीकरणासाठी संघटीत होऊन कार्यरत होण्याची गरज असल्याचे मत सौ ज्योतीताई नारायण पाटील यांनी व्यक्त केले. जेऊर ता करमाळा येथील एका आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मा.आ.नारायण पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे वर्ष हे एकविसावे वर्ष होते. या निमित्ताने दि 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आज या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.यात 1) रांगोळी- स्वाती व्हरे, अर्चना कुलकर्णी व सोनल कांबळे 2)मेहंदी – हिना फकीर, जाबिया नदाफ, अर्चना कुलकर्णी ,3)उखाणे- रोहिणी सुतार, अपर्णा पाथ्रुडकर, तारामती सरडे, नयन राठोड 4) अनूभव कथन-मनिषा वनवे, श्वेता गादिया, साधना लुणावत 5)हस्तकला-पुजा माळवे, वैशाली पाथ्रुडकर, मनिषा वनवे, 6)डान्स – मनिषा कर्णवर, अपर्णा पाथ्रुडकर, युनिटी ग्रुप 7) अंताक्षरी- साधना लुणावत ग्रूप, जयश्री दराणे ग्रुप, पुनम सोळंकी ग्रुप, यास्मीन शेख ग्रुप, समिना फकीर ग्रुप, शुभांगी कुलकर्णी ग्रुप, सोनल कांबळे ग्रुप, अपर्णा पाथ्रुडकर ग्रुप, सुषमा सांगडे ग्रुप, रोहीणी सुतार ग्रुप, सूरेखा शिंदे ग्रुप मनिषा लोंढे ग्रुप 8) संगीत खुर्ची – अर्चना कानगुडे, मनिषा वनवे , 9) सुंदर गार्डन- जयश्री दळवी, डाॅ शारदा सुराणा, सारीका दोशी, 10)बेस्ट सोशल मेडीया रिल्स-कल्पना आखाडे, शितल माने सुंदर किचन – साधना लूणावत, नंदा गादीया, सारीका दोशी, अश्विनी काळे, अर्चना कुलकर्णी 12) पाककला – रागीनी ठाकर, प्रगती गादीया, संध्या हेळकर, सुमन घोरपडे, वैशाली भोसले,लता निंबाळकर, अंकीता वेदपाठक, सुवर्णा बादल, प्रभावती व्हरे,आलीया शेख, मिनाक्षी कात्रेला, रत्नमाला बादल, आरती पाबळे, स्नेहल पाटील, सुरेखा आरकीले, जनाबाई कांबळे, स्वाती सुरवसे, प्रिया सोळंकी, तसलीम शेख, स्वप्नाली सरडे, संगिता सुळ यांचेसह 39 स्पर्धक आदिंना बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक सूनील तळेकर यांनी केले. महिलांचे समाजातील महत्व व योगदान या विषयावर सिनेअभिनेते व व्याख्याते डाॅ प्रा. संजय चौधरी यांनी विचार मांडले तर पांडूरंग वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ माया तळेकर, सौ लकडे, सौ सुकेशिनी बंडगर, सौ आवटे, सौ खंडागळे यासह कु मोटे, कु कुलकर्णी, कु आदिनी अथक परिश्रम घेतले.
करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथे ग्रामपंचायतीचा सर्व कारभार हा महिला सदस्या पहात असून येथे ग्रामस्थांनी सर्व प्रभागात व सर्व जागांवर महिलांना बिनविरोध निवडून दिले आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ स्वाती पाटील व सर्व महिला सदस्यांचे सत्कार महिला नेत्या सौ जोतीताई नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले