दिशा शक्ती प्रतिनिधी / शेख युनुस : अवैधरित्या गावठी पिस्टलची विक्री करणा-या सात सराईत आरोपींना गुन्हे शाखा ६ व १ ने जेरबंद केले आहे. शिवाय, त्यांच्याकडून एकूण १७ पिस्टल व १३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. त्या अनुशंगाने पुणे शहरा मध्ये अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणा-या तसेच विक्री करणा-यांवर आळा बसावा तसेच त्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंध कारवाईसाठी हद्दीत पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग मोहीम राबवून कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी आदेश दिलेले होते.युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलिस पथक हे हददीत गस्त करत असताना २५/०२/२०२३ रोजी पोलिस पथकास पिस्टल विक्री करणारे दोन डिलर हे नानाश्री लॉज समोर वाघोली पुणे येथे आले असल्याची बातमी मिळाली होती. युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल व त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता
१) हनुमंत अशोक गोल्हार (वय २४ वर्षे रा. मु. पो. जवळवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर)
२) प्रदिप विष्णू गायकवाड (वय २५ वर्षे रा. मु.पो.ढाकणवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर,मुळ रा. नगररोड, चहाट फाटा, तालूका जिल्हा बीड) असे महिंद्रा कार मध्ये बसलेले असताना ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता गाडीत १ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आले. सदर पिस्टल हे त्याने विक्री करता आणले असल्याचे सांगीतल्याने त्यांचेवर लोणीकंद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.दोघांची पोलिस कस्टडी घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता हनुमंत अशोक गोल्हार हा ए.पी.एम.सी. पोलिस स्टेशन गु.र.नं. १२८/२०१७ नवी मुंबई येथील २.८ कोटी रुपयेचा दरोडा घातल्या प्रकरणी पाहीजे आरोपी असल्याचे तसेच भारती विदयापिठ पोलिस स्टेशन गु.र.नं.६५८/२०१९ आर्म अॅक्ट प्रमाणे दाखल गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे समजले. त्याचे कडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करता सदर अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांचेकडून विकत घेणारे आरोपी ३) अरविंद श्रीराम पोटफोडे वय ३८ वर्षे, रा. अमरापुरता शेवगाव जि. अहमदनगर
४) शुभम विश्वनाथ गरजे वय २५ वर्षे रा.मु.पो.वडुले ता. नेवास जि. अहमदनगर
५) ऋषिकेश सुधाकर वाघ वय २५ वर्षे रा.मु.पो. सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर
६) अमोल भाऊसाहेब शिंदे वय २५ वर्षे रा. मु. पो.खडले परमानंद ता.नेवासा जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे.वेगवेगळ्या ठिकाणी छापा करवाई करुन एकुण १३ गावठी बनावटीचे पिस्टल ४ जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल असे एकूण २१,३२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे हददीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना बारणेरोड सिंचन भुवन समोर एक जण उभा असून त्याचेकडे अनधिकृत पिस्टल असल्याचे समजल्याने त्यांनी सदर ठिकाणी सापळा लावला. साहील तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय २१ वर्ष रा वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ, सुसगाव, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे निळे रंगाचे सँगमध्ये कि रू ६०,०००/- ची एक देशी बनावटीची पिस्टल व किं रू २,०००/- चे दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदरबाबत समर्थ पो स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्यांनी तो कामास असलेल्या व्यंकटेशपार्क, को ऑप सोसायटीसमोर, सुतारवाडी, लिंकरोड, पाषाण, पुणे येथील ऑटो कस्टम स्टुडीओ टु व्हिलर नावाचे गॅरेजमध्ये आणखी तिन पिस्टल व काही जिवंत काडतुसे लपवून ठेवली असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणी आरोपीसह जावून तेथून ०३
देशी बनावटीच्या पिस्टल व ०७ जिवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यात किं.रू.२,४९,०००/- चे असे एकुण ०४ पिस्टल व ०९ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील प्रमाणे गुन्हे शाखे कडुन कारवाई करुन ७ आरोपी यांचेकडून एकुण १७ गावठी बनावटीचे पिस्टल १३ जिवंत काडतुसे तसेच एक महीद्रा कार, मोबाईल असा मिळुन एकुण २३,८१,००० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
HomeUncategorizedपुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई;१७ पिस्टल व १३ जिवंत काडतुसे जप्त; पाथर्डीतील दोघांचा समावेश.
पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई;१७ पिस्टल व १३ जिवंत काडतुसे जप्त; पाथर्डीतील दोघांचा समावेश.

0Share
Leave a reply