जितू शिंदे / प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम कायगाव येथे चौघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील काही तरुण कायगाव येथे आले होते. त्यांचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.
पाण्यात पडलेल्यांमध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), आकाश भागिनाथ गोरे (वय 20) व शंकर पारसनाथ घोडके (वय 22) या चौघांचा समावेश आहे.दुपारी साडेतीन ते चार च्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अन्य तिघांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. हे सर्व चौघे वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहेत.
Leave a reply