दिशा शक्ती प्रतिनिधी : जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अहमदनगर,(अहिल्यानगर) यांच्या वतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा ” अहिल्यादेवी होऴकर जीवन गौरव २०२३ पुरस्कार ” करीता मुंबई मधील कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार भारत कवितके यांना रविवार दिनांक १९ मार्च २०२३रोजी सकाळी १०:३० वाजता माऊली संकुल सभागृह (झोपडी कन्टीन शेजारी) सावेडी, अहमदनगर (अहिल्यानगर) येथे मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी निवडपत्राव्दारे भारत कवितके यांना कऴविले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहमदनगर (अहिल्यानगर) यांनी राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर केले आहेत.सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी संस्थेने भारत कवितके यांची पुरस्कार साठी निवड केली आहे.भारत कवितके यांनी समाजाच्या अनेक समस्यावर वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करुन समाज जागृती,जनजागृती केलेली आहे.आता पर्यंत भारत कवितके यांना ” मुंबई भूषण” ,” यशवंतराव होऴकर पुरस्कार ” समाज भूषण पुरस्कार ” “समाज रत्न पुरस्कार ” “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होऴकर पुरस्कार ” वगैरे वगैरे विविध संस्थाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पुरस्कार मिऴणे म्हणजे पूर्वीपेक्षा समाजाप्रती काम करण्याची जास्ती जास्त जबाबदारी वाढणे होय, व्यक्तीपेक्षाही समाज मोठा समजून समाज सेवा करण्याची माझी प्रथमपासूनची सवय आहे. ‘ अशी प्रतिक्रिया भारत कवितके यांनी दिली.भारत कवितके यांना ” अहिल्यादेवी होऴकर जीवन गौरव २०२३पुरस्कार साठी निवड होताच अनेक संस्थानी,समाज बांधवांनी,व नातेवाईकांनी भारत कवितके यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a reply