Disha Shakti

Uncategorized

शिवजयंती निमित्त माऊली चोर येथिल विद्यार्थी व युवकांनी घेतली शपथ

Spread the love

अमरावती प्रतिनिधी /आकाश मुंदाने : शिवजयंतीचा कार्यक्रम माहुली चोर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. माऊलीचा राजा गणेशोत्सव मंडळ आणी जयअंबे मंडळच्या कार्यकर्त्यांनी माहुली चोर येथील ग्रामपंचायत प्रांगनामधे दरवर्षी प्रमाणे शिवजयंती साजरी केली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी ह.भ.प श्रीराम महाराज प्रमूख वक्ता म्हणून श्री.विपिनजी काकडे, उपसरपंच श्री.राजु सरोदे,निखिल चोरे,अरुण गाड़ेकर,राजु कोकाटे, रवि भागवत, दामोधर चुडे ,मधूकर निकम ,आदी मंचावर उपस्थीत होते,कार्यक्रमाचे संचालंन धीरज तायडे यांनी केले.

शिवजयंती निमित्य मनोगत व्यक्त करताना अंकुश कोल्हे या तरुणाने कितिही मोठे संकट आले तरी कुठल्याही परीस्थिती ला घाबरनार नाही मी कधीच आत्महत्या करनार नाही अश्या शब्दात शेकडो युवकानं सोबत स्वत शपथ घेतली यावेळी गौरव सुरोशे अक्षय पवार अमोल इंगोले भुषण साव माणिष देठे आदित्य चोरे दीनेश झंजाट उमेश हंबर्डे महेश खांडेकर प्रदिप सुरोशे आकाश अंबर्ते अक्षय जाधव अतुल जाधव मोहन टोलमारे शिवा दरने अक्षय भातकूलकरज धीरज तायडे प्रफुल्ल वाघ गोपाल तिखिले सुरज गाड़ेकर नंदू राऊत विनेश चोखट अक्षय अंबर्ते संजय पवार इत्यादी युवकांनी उपस्थित राहून शपथ घेतली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!