Disha Shakti

Uncategorized

सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघेंनी आपल्या पत्रकार मित्र परिवारासह रंग पंचमी सण केला उत्साहात साजरा

Spread the love

प्रतिनिधी /शेख युनुस : अहमदनगर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील साकूर गावात रंग पंचमी सण मोठ्या थाटामाटात आणि कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता रंग पंचमी साजरी करण्यात आली. सविस्तर माहिती अशी कि साकूर येथील श्री क्षेत्र बिरोबा महाराजांच्या पावन भुमीत साकूर पंचक्रोशीतील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात असून व्यापारी वर्ग ,राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील युवक कार्यकर्ते हे सर्व धर्म समभाव एकजुटीने आपला आनंद उत्साहात सहभाग नोंदविताना दिसतात. ‌साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघेंनी आपल्या पत्रकार बंधू (राजसत्ता न्यूज चे संस्थापक अध्यक्ष सहदेव जाधव पाटील, तसेच डी एस न्यूज 24 चे संस्थापक किरण पुरी साहेब, आणि भारतनामा, खबरनामाचे व दिशाशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी शेख युनुस ) आणि साकूर येथील हॉटेल मालक पवार साहेब यांच्या समवेत रंग पंचमी आनंदात व उत्साहात साजरी केली. ‌ ‌‌‌‌‌‌‌

त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण खास होतो. साकूर पंचक्रोशीत रंगपंचमी सण उत्सव हा साजरा करण्यात आला असून सामाजिक कार्यकर्ते सुनिल ईघे यांनी आपल्या पत्रकार मित्र परिवारासह रंग पंचमी साजरी करत संगमनेर तालुक्यातील व साकुर परिसरातील सर्व जनतेला रंग पंचमीच्या आणि होळीच्या लाख लाख शुभेच्छा देत समभाव, एकजुटीने जातीय सलोख्याने एका आईचे लेकर होऊन जीवन आनंदात जगा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत रंगपंचमी व होळीच्या आभाळभर मनापासून शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!