दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : भीमा पाटस कारखान्यामध्ये सुमारे 500 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्यावर केला असून त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या गावात राहू येथे जोडे मारोआंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी सर्व सामन्य लोकांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी राऊंतांच्या पुतळ्याला जोड्याचा हार घालून, जोडे मारून, पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. निषेध सभेसाठी राहू बेट परिसरातील राहू, पिलानवाडी, टेळेवाडी, कोरेगाव भीवर, वाळकी, दहीटने, मिरवडी, देवकरवाडी, पाटेठाण, सहजपूर, नांदूर येथील हजारो नागरिक सहभाग झाले होते.
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे भीमा पाटस कारखाना सुरु झाला असून तालुक्यातील काही विरोधकांच्या पोटात गोळा आला असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, सरपंच दिलीप देशमुख, कैलास गाढवे, मारुती मगर, डॉ. विलास भंडारी, अरुण नवले, हनुमंत बोरावणे, युवराज बोराटे, मनीषा नवले, जयश्री जाधव, रोहिदास टिळेक, रोहिदास कंद, सुधाकर थोरात, पांडुरंग सोनवणे, आनंद कदम, पृथ्वीराज जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
Leave a reply