अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : जिल्ह्याभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा बँक निवडणूकीत माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी दणदणीत विजय मिळवला असून तो विजय माझ्या सारख्या सामान्य दोन वेळेस चेअरमन पदाची संधी मिळाली असे मत शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. मागील काळात आपण संचालक म्हणून कामकाजात विशेष सहभाग नोंदवला असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निस्वार्थपणे काम केले आहे.लवकरच जिल्हा बँकेत सातशे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांनी केली.
जिल्हा अहमदनगर बँकेच्या अध्यक्षपदाची नुकतीच निवड करण्यात आली. शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव करत बाजी मारली अध्यक्षपदी पदभार स्वीकारला. अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणुक ही राज्यभर गाजली आणि जंगी लढत होऊन शिवाजीराव कर्डीले यांनी जिल्हा बँकेत आपल्या कामाचा ठसा उमटून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत आभार व्यक्त केले.