अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या ताहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज मंदिरातील दानपेटी फोडून चोरटे पसार. सविस्तर माहिती अशी कि,ताहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थानातील सुमारे तीन दान पेट्या फोडून त्यामधील रक्कम अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून पोबारा केला. दिनांक 12 मार्चला सकाळी चोरी झाल्याचे निर्देशनात आले असता स्थानिक गावकऱ्यांनी मंदिरातील परिसरात पाहणी केली परंतु चोरांच्या काही दिशा मार्ग समजू शकला नाही.ताहाराबाद येथील चोरीमुळे ताहाराबाद पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जागृत देवस्थान म्हणून संत कवी महिपती महाराजांची ख्याती आहे.
दिनांक 11 मार्च ला रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास पुजारी महाराज घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत सी सी टी व्ही चा डी व्ही आर फोडला नंतर दानपेट्यांकडे आपला मार्ग वळवत दानपेट्या फोडून त्यामधील सुमारे 15 हजाराच्या आसपास रक्कम व सी सी टि व्ही चे डी व्ही आर घेऊन पसार झाले. संत कवी महिपती महाराज देवस्थान चे कर्मचारी सुभाष मुंढे हे सकाळी 6 वाजेच्या सुमारास मंदिरात आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निर्देशनात आले असता त्यांनी तांबडतोब देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र रावसाहेब साबळे यांना फोनवर चोरी झाल्याची माहिती दिली असता राजेंद्र साबळे यांनी राहुरी पोलीसांना संपर्क करताच राहुरीचे पोलीस पथक संत कवी महिपती महाराज देवस्थान येथील घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहे.
Leave a reply