राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अहमदनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल राहुरी खुर्द व गोटूंबे आखाडा भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने बुऱ्हानगर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आlला.
यावेळी राहुरी खुर्द ग्रामपंचायत चे उपसरपंच तुकाराम बाचकर, राहुरी तालुका प्रहार समन्वयक व तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, व ग्रामपंचायत सदस्य व बूथ प्रमूख शिवाजी शेंडे, राहुरी खुर्द ग्रामपंचायत सरपंच यांचे पती अंबादास साखरे, मनोज घोकसे, अमोल डोळस, पाटीलबा बाचकर, राधाकिसन बाचकर, तबाजी बाचकर इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते